लोकांना ठरवून मारले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:15+5:302021-04-12T04:29:15+5:30

रत्नागिरी : लोकांना ठरवून मारले जातेय. हकनाक लोकं मारली जात आहेत, याला जबाबदार कोण? हे ऑर्गनाईज क्राईम आहे. ...

People are being killed | लोकांना ठरवून मारले जातेय

लोकांना ठरवून मारले जातेय

Next

रत्नागिरी : लोकांना ठरवून मारले जातेय. हकनाक लोकं मारली जात आहेत, याला जबाबदार कोण? हे ऑर्गनाईज क्राईम आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावला पाहिजे, असा गंभीर आरोप माजी खासदार व भाजप नेते नीलेश राणे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

नीलेश राणे यांनी रविवारी रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. यावेळी त्यांनी अपुऱ्या आराेग्य यंत्रणेबाबत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, हे निग्लीजियन्स ऑफ ह्युमन लाईफ आहे. आपण न्यायालयतही जायला तयार आहाेत. निग्लीजियन्स ॲक्ट अंतर्गत या सगळ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे. परंतु, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इतके दिवस थांबल्याचे राणे यांनी सांगितले. राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्तपदांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, जिल्हा आरोग्य विभागाकडे कर्मचारी नाहीत, आरोग्य व्यवस्था नाही. मग लस कशासाठी मागताय, त्याचे वाटप कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यासाठी आणखी अडीच हजार बेड्स दिल्याचे जाहीर केले होते. त्यावर राणे यांनी मंत्री सामंत यांनी दिलेले बेड कुठे आहेत, ते दाखवावेत. ते बेड दाखवून दिल्यास आपण स्वत: बक्षीस देऊ, असे सांगितले.

खनिकर्मकडून जिल्ह्याला १५ रुग्णवाहिका देणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केल्यानंतर माजी खासदार राणे यांनी खनिकर्ममधून रुग्णवाहिका देऊ शकतात का, त्याबाबतचा अध्यादेश दाखवून द्यावा, असे आव्हान दिले. तसेच रुग्णवाहिका आल्यावर त्याला चालक कुठे आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला.

Web Title: People are being killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.