दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ नियमित मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:17+5:302021-08-26T04:33:17+5:30

असगोली : दिव्यांगांना मिळणाऱ्या संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ नियमित मिळावा, दिव्यांगांवरील आर्थिक भार कमी व्हावा व ...

People with disabilities should get the benefit of pension scheme regularly | दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ नियमित मिळावा

दिव्यांगांना पेन्शन योजनेचा लाभ नियमित मिळावा

Next

असगोली : दिव्यांगांना मिळणाऱ्या संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ नियमित मिळावा, दिव्यांगांवरील आर्थिक भार कमी व्हावा व थकित असलेली सर्व पेन्शन दिव्यांगांना गणपती सणापूर्वी मिळावी, यासाठी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले.

संस्थेतर्फे नवीन नियुक्त तहसीलदार प्रतिभा वराळे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार सर्व दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी प्रत्येक दिव्यांगांचे स्वतंत्र रेशन कार्ड तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना येतात; परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक दिव्यांगांना अशा योजनांपासून वंचितच राहावे लागत आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा अनेक मागण्यांचे निवेदन अध्यक्ष उदय रावणंग यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दिले आहे.

Web Title: People with disabilities should get the benefit of pension scheme regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.