रामदास कदमांना जनताच हद्दपार करेल

By admin | Published: May 30, 2016 10:26 PM2016-05-30T22:26:45+5:302016-05-31T00:34:04+5:30

संजय कदम : खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत जोरदार टिकास्त्र; सर्व आरोपांना प्रत्युत्तर

The people will be deported to Ramdas Kadam | रामदास कदमांना जनताच हद्दपार करेल

रामदास कदमांना जनताच हद्दपार करेल

Next

खेड : मला गोरगरीब जनतेने आमदार केलय़ं इथल्या लोकांनाही माहीत आहे की, मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलयं, त्यांच्या मदतीला धावून जातो. केवळ मतांकडे पाहिले नसल्याने जनतेने मला मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. रामदास कदम हे केवळ मतांसाठी जोगवा मागत आहेत़, हे जनतेने विसरू नये़ आगामी निवडणुकीत जनताच त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन खेड, दापोली व मंडणगडचे आमदार संजय कदम यांनी केले़
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खेड नगर परिषदेच्या स्व़ किशोर कानडे मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये आमदार संजय कदम बोलत होते. खेडचे माजी आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका सभेमध्ये संजय कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष अजित यशवंतराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा युवकचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, दापोलीचे जयंत जालगावकर, चिपळूणचे जयंद्रथ खताते, मंडणगडचे प्रकाश शिगवण, मंडणगडच्या नगराध्यक्षा श्रुती साळवी, कोकण बँकेचे बशीर मुर्तूझा, सुलतान मुकादम, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर, रमेश दळवी, रमेश चव्हाण, मोहन मुळ्ये, सायली कदम, शिवराम दळवी, सिंकदर जसनाईक, मुंबइचे मनोज घागरू, नगरसेवक सतीश चिकणे, बोरघरच्या सरपंच हौसाबाई पवार उपस्थित होते़
यावेळी संजय कदम यांनी रामदास कदम यांच्या एकूण कार्यपध्दतीवर परखड टीका केली़ रामदास कदम हे विविध समाजांचे लांगुलचालन करत आहेत़ मात्र, त्यांना तो अधिकार नाही़ कारण तालुक्यातील विविध समाजांना त्यांनी गेल्या २५ वर्षामध्ये न्याय दिला नसून, त्यांचेवर अन्यायच केल्याचे सांगितले. आजपर्यंत त्यांनी तालुक्याचा विकास करण्याऐवजी अधोगतीच केली आहे़ संजय कदम यांच्यावर केलेल्या भगतगिरीच्या आरोपाचे खंडन करत आपण तसे काही केले नसून रामदास कदम हे खोटे बोलत आहेत, त्यांनी ते सिध्द करून दाखवावे, असे आव्हान दिले.
संजय कदम म्हणाले की, मी गोरगरीब समाजाचा आमदार आहे. मात्र, एवढ्या खालच्या पातळीवर जावून केलेली टीका एका जबाबदार मंत्र्याला शोभत नाही, असे सांगितले. रामदास कदम यांना तत्कालीन केशवराव भोसले आणि तु़ का. कदम यांच्या भांडणात लॉटरी लागल्याचे स्मरण करून दिले. पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नका, असे सांगत त्यांनी गुहागर मतदार संघातून रामदास कदम यांचा पराभव झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला निघाले होते, असा गौप्यस्फोट संजय कदम यांनी यावेळी केला. मात्र, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही थारा दिला नसल्याचे संजय कदम यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले की, जिल्ह््यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व यापुढे आमदार संजय कदम यांनी करावे, असे सांगितले़ तर प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव यांनी आमदार संजय कदम हेच यापुढचेही आमदारकीचे उमेदवार असतील असेही जाहीर केले. (प्रतिनिधी)

21भाषा शोभत नाही : जागा मालकाला पैसे दिले नसल्याचा आरोप
एकाही कुटुंबाला त्यांनी रोजगार दिला नाही. त्यामुळे रोजगार देण्याची भाषा यांच्या तोंडात शोभत नसल्याचे सांगत रामदास कदम यांनी गेली २५ वर्षे केवळ कमिशन खाण्याचे काम केले. दुसऱ्याकडे बोट दाखवून त्याचा त्यांना काहीही लाभ होणार नसल्याचा टोला यावेळी संजय कदम यांनी हाणला.

डेंटल मेडिकल कॉलेजसाठी जी जागा घेतली आहे, त्या जागेच्या मालकाला अद्यापही जागेचे पैसे दिले नसून, त्याची घोर फसवणूक केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला़ त्यामुळे जनतेची फसवणूक करण्यासाठी रामदास कदम असल्याचा टोलाही संजय कदम यांनी सभेत लगावला.

Web Title: The people will be deported to Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.