टीकेला पुढील निवडणुकीवेळी जनताच उत्तर देईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:01+5:302021-05-16T04:31:01+5:30

रत्नागिरी : भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी माझ्यावर केलेल्या टीकेचे उत्तर पुढील निवडणुकीवेळी जनताच देईल, त्यांचा विषय माझ्यासाठी ...

The people will respond to the criticism in the next elections | टीकेला पुढील निवडणुकीवेळी जनताच उत्तर देईल

टीकेला पुढील निवडणुकीवेळी जनताच उत्तर देईल

Next

रत्नागिरी : भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी माझ्यावर केलेल्या टीकेचे उत्तर पुढील निवडणुकीवेळी जनताच देईल, त्यांचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात सामंत यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सध्या जिल्हा कोरोनाशी लढत आहे. कोविडच्या संकटात सगळ्यांनीच एकत्र यायला हवे. मात्र, बाळ माने यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे उत्तर त्यांना नियती आणि येणारा काळच देईल. मी कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही. माझ्यावर टीका केली, त्यांचे राजकीय करिअर काय झाले, हे सर्वांना माहीत आहे. काही राजकीय ‘इथिक्स’ असतात. माझ्या दृष्टीने आता जिल्ह्याच्या सीमेवर आलेले चक्रीवादळ आणि कोरोना परिस्थिती महत्त्वाची आहे. बाळ माने यांचा विषय माझ्यासाठी आधीच संपलेला आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेला जनताच उत्तर देईल.

उदय सामंत २०१४ सालापासून राजकारणात आले, तेव्हापासून त्यांनी राजकारणात गुंडगिरी वाढविली, पिढी बरबाद केली, असा आरोप बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, असल्या घाणेरड्या आरोपाला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. मी गुन्हेगारीकरिता ताकद दिली असेल तर तसा पुरावा बाळ माने यांनी सादर करावा. पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ, तेव्हा हे जनताच ठरवील. ही पत्रकार परिषद माझी मते वाढविणारी आहे. आपण देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देऊ. मात्र, बाळ माने यांच्या टीकेला आपले शाखा प्रमुखही उत्तर देतील, असा टोला सामंत यांनी लगावला. बाळ माने यांनी निबंधरूपी ही जी पत्रकार परिषद घेतली, त्या कागदरूपी कारवाईला आपल्या मनापासून शुभेच्छा असल्याचे सांगून सामंत यांनी त्यांचा विषय संपल्याचा पुनरुच्चार केला.

Web Title: The people will respond to the criticism in the next elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.