ऑक्सिजन सिलिंडरचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:30 AM2021-05-23T04:30:21+5:302021-05-23T04:30:21+5:30
सिद्धी शिंदेचे यश चिपळूण : जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी ...
सिद्धी शिंदेचे यश
चिपळूण : जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सिद्धी संजय शिंदे हिने ९९.५७ टक्के गुण मिळवत एसपीएसारख्या नामांकित विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत पात्र होण्याचा बहुमान मिळविला आहे.
वार्षिकोत्सव ऑनलाईन
गुहागर : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरचा वार्षिकोत्सव ‘सप्तक २०२१’ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गुगल मीट, गुगल फॉर्म, झुम मीट, व्हॉट्सअॅप ग्रुप, डिस्कॉट अॅप या तंत्रज्ञानाचा वापर करुन सात दिवस ऑनलाईन कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या.
ऑनलाईन कर्ज योजना
रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार मंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या कृषी मालाच्या पावतीवर तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य वखार मंडळ व राज्य सहकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन तारण योजना सुरु करण्यात आली आहे.
सुधारित वेतनश्रेणी
रत्नागिरी : केंद्र सरकारने केेंद्रीय विद्यापीठे, महाविद्यालये, संस्था यांना सातवा वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी लागू केल्या आहेत. वाढीव वेतनाच्या फरकातील भार केंद्र व राज्य सरकार सोसणार आहे. केंद्राकडून राज्याला ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर थकबाकीची रक्कम अदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.