मुंबईतून रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांची गाव गाठण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:46+5:302021-04-19T04:27:46+5:30

खेड : संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी एस. टी. सेवा सर्वसामान्य जनतेला बंद केली आहे. त्यामुळे चाकरमानी मंडळींना कोकणात ...

Pipe to reach Chakarmanya's village by train from Mumbai | मुंबईतून रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांची गाव गाठण्यासाठी पायपीट

मुंबईतून रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांची गाव गाठण्यासाठी पायपीट

Next

खेड : संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी एस. टी. सेवा सर्वसामान्य जनतेला बंद केली आहे. त्यामुळे चाकरमानी मंडळींना कोकणात आपल्या गावी येण्यासाठी आता केवळ रेल्वे प्रवास हाच पर्याय उपलब्ध आहे. तालुक्यासह मंडणगड व दापोली तालुक्यातील अनेक गावांतील जनतेला खेड रेल्वेस्थानक रेल्वे प्रवासाठी उपयोगी ठरते. मात्र, रेल्वेने आल्यानंतर एस. टी. सेवा बंद असल्याने त्यांना पायपीट करतच गाव गाठावे लागत आहे.

मुंबई व पुणे येथील वाढत्या कोरोना संसर्गामुळे तात्पुरत्या रोजगारासाठी या शहरात राहणारे चाकरमानी अजूनही गावी येण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या स्पेशल गाड्यातून मुंबईतील चाकरमानी खेड रेल्वेस्थानकावर उतरत आहेत. मात्र, पुढे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. खेड एस. टी. बसस्थानकातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दापोली, मंडणगड, चिपळूण व रत्नागिरी या मार्गावर एस. टी. बस सुरू ठेवण्यात आल्या आहेत तर उर्वरित सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसमध्ये केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे रेल्वेने खेड एस. टी. बसस्थानक येणाऱ्या प्रवाशांना निराश होऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांची संख्या तुरळक असल्याने बरेच प्रवासी पायपीट करीत आपले गाव गाठत आहेत. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खेड शहरात केवळ रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स तसेच इतर संदर्भ सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद असल्याने एस. टी. बसस्थानकातून या रेल्वेने दाखल झालेल्या प्रवाशांना बसस्थानकात असलेल्या पाणपोईतून पाण्याची बाटली भरून घेऊन पायी घर गाठावे लागत आहे.

................................

khed-photo174 खेड येथे रेल्वेने आलेले प्रवासी एस. टी. बसस्थानकात विश्रांती घेऊन पायी चालत आपले घर गाठत आहेत.

Web Title: Pipe to reach Chakarmanya's village by train from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.