Ratnagiri: राजापुरात सापडला पिसोरी (गेळा) जातीचा वन्यप्राणी

By अरुण आडिवरेकर | Published: August 8, 2023 07:36 PM2023-08-08T19:36:07+5:302023-08-08T19:36:30+5:30

वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले

Pisori (Gela) wild animal found in Rajapur | Ratnagiri: राजापुरात सापडला पिसोरी (गेळा) जातीचा वन्यप्राणी

Ratnagiri: राजापुरात सापडला पिसोरी (गेळा) जातीचा वन्यप्राणी

googlenewsNext

राजापूर : शहरातील काेदवली - साईनगर येथील राजन मधुसूदन गाेखले यांच्या राहत्या घराच्या पडवीत साेमवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी ६:१५ वाजता पिसाेरी (गेळा) जातीचा वन्यप्राणी आढळला. या प्राण्याची वैद्यकीय तपासणी करून ताे सुस्थितीत असल्याची खात्री करून नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.

पिसोरी (गेळा) हा वन्यप्राणी नर जातीचा असून, त्याचे वय ७ ते ८ महिने आहे. राजन गाेखले यांच्या घराच्या पडवीमध्ये पिसोरी (गेळा) जातीचा वन्यप्राणी आल्याचे कळताच प्रशांत करांडे यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक विक्रम कुंभार, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, नीलेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दीपक म्हादये यांनी जागेवर जाऊन पिसोरी (गेळा) या प्राण्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले.

त्यानंतर राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रभात किनरे यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. ताे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.

टाेल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या आदेशान्वये कुठलाही वन्य प्राणी मानव वस्तीमध्ये आढळल्यास वनविभाग टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pisori (Gela) wild animal found in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.