तीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:33+5:302021-06-26T04:22:33+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर तीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडले आहेत. त्यामुळे ...
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर तीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडले आहेत. त्यामुळे दाभोळे, मेढे, कोंडगाव, साखरपा, आंबा घाट परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात खड्डे भरले जातात आणि पावसाळ्यात उखडतात़. त्यामुळे उन्हाळ्यात भरलेल्या खड्डयांची पावसाळ्यात ‘नाे गॅरंटी’ अशीच काहीशी अवस्था झाली आहे. हे खड्डे चुकवताना अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरील खड्डे पाहता कामाचा दर्जा घसरल्याची भावना व्यक्त हाेत आहे. त्यामुळे केवळ दोन ते तीन महिन्यांसाठी खड्ड्यांवर हजारो रुपये खर्च केले जातात. हा सर्व खर्च वाया जात असून, त्याचा त्रास मात्र वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
------------------------
रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड बनले आहे. (छाया : संताेष पाेटफाेडे)