गुहागर बायपास मार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:08+5:302021-05-07T04:33:08+5:30
अडरे : मुंबई-गोवा महामार्गावर वरून चिपळूण ते मिरजोळीदरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यात ...
अडरे : मुंबई-गोवा महामार्गावर वरून चिपळूण ते मिरजोळीदरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यात पूर्वी न भरल्यास खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होणार आहे. वाहन चालवताना व खड्डा चुकवता अपघात होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात या मार्गावरून मुंबई, गुहागरकडे जाणाऱ्या गाड्यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागते. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून खड्डा चुकवता अपघात होण्याची शक्यता असते. तसेच खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या व वाहनचालकांच्या अंगावर उडते. अनेक वेळा वाहनांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. या रस्त्यावर खेंड ते मिरजोळी या मार्गावरून जाताना नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.