अंतर्गत रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:42+5:302021-06-25T04:22:42+5:30
चिपळूण : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील गुहागर बायपास ...
चिपळूण : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील गुहागर बायपास रोडही खड्ड्यांनी झाकोळून गेला आहे. देसाई बाजार ते लाईफ केअर हॉस्पिटल या भागातही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हॉटेल व्यावसायिक संभ्रमात
दापोली : गेल्या सव्वा वर्षापासून तालुक्यातील पर्यटनाला खीळ बसली आहे. आता पावसाळ्यात पर्यटक पर्यटन स्थळांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळे सुनीसुनी झाली आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन हंगाम वाया जात असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. सध्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिक संभ्रमात आहेत.
राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन
रत्नागिरी : १९५७च्या स्वातंत्र्य संग्रामातील झुंझार राणी लक्ष्मीबाई यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कऱ्हाडे ब्राम्हण संघातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, प्रतिभा प्रभूदेसाई, मानस देसाई, उदय काजवेकर, आदी उपस्थित होते.
विलगीकरण कक्ष सज्ज
रत्नागिरी : शासनाने सौम्य लक्षणे असलेल्या गावातील कोरोना रुग्णांसाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्तरावरच विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना निधीही दिला जाणार आहे. त्यामुळे दोनपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी पुढे आल्या आहेत.
आंबवकर यांचा सत्कार
रामपूर : येथील मिलिंद हायस्कूलचे वरिष्ठ लिपीक प्रमोद आंबवकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव म्हणून ते गेली नऊ वर्षे कार्यरत होते. त्यांनी जिल्हा माध्यमिक सेवक कर्मचारी पतपेढीचे संचालक म्हणूनही काम केले आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.