आबलोली विद्यालय परिसरात बार्टीतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:35+5:302021-06-25T04:22:35+5:30
आबलोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ...
आबलोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली (ता. गुहागर) येथे वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा ढळता समतोल व वाढते प्रदूषण लक्षात घेता, तसेच कोरोना काळात रुग्णांना जाणवलेला प्राणवायूचा तुटवडा या सर्व समस्या लक्षात घेऊन पर्यावरण दिनापासून बार्टीतर्फे वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला़ त्या अनुषंगाने तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे समतादूत शीतल पाटील यांनी सांगितले.
आबलोली विद्यालय परिसरात वृक्षारोपणप्रसंगी मुख्याध्यापक डी. डी. गिरी, संचालिका सुषमा उकार्डे, एस. पी. भोसले, एन. पी. जगताप, आर. बी. अहिरे, व्ही. व्ही. ढवळ, आर. आर. सौंदेकर, पी. आर. वैद्य, डी. पी. नेटके, एस. ए. कदम, पी. एस. व्हनमाने, शिक्षकेतर कर्मचारी आर. पी. साळवी, एस. डी. मोहिते, एम. व्ही. सुर्वे, पी. आर. सुर्वे, अंगणवाडी सेविका प्रिया कदम, तालुका समतादूत शीतल पाटील उपस्थित होते. वैभव ढवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.