तीन लाख वृक्षांची लागवड

By Admin | Published: June 22, 2017 12:33 AM2017-06-22T00:33:16+5:302017-06-22T00:33:16+5:30

रत्नागिरीतील उपक्रम : गत वृक्षलागवडीचा त्रैमासिक आढावा, ८0 टक्के यश

Planting of three lakh trees | तीन लाख वृक्षांची लागवड

तीन लाख वृक्षांची लागवड

googlenewsNext

मेहरून नाकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जागतिक तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असताना रत्नागिरीत तीन लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात येणार असून, १ ते ७ जुलैअखेर लागवड महोत्सव राबविण्यात येणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्ष लागवड करण्यात आली होती. लागवडीपासून सातत्याने त्रैमासिक आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत ८० टक्के झाडे जिवंत आहेत.
हरित सेना महाराष्ट्रतर्फे प्रत्येक नागरिकाला वन व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबर लोकसहभागातून वन व वन्य जीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यात यावे, यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात हरित सेना सदस्यत्व नोंदणी ६६६.ॅ१ीील्लं१े८.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावर करता येणार आहे. वृक्ष लागवडीची माहिती आॅनलाईन सादर करायची आहे. हरित सेना सदस्यत्व नोंदणीनंतर वृक्ष लागवडीपूर्वी व लागवडीनंतरची सर्व माहिती सादर करता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ पर्यत तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन २०१७मध्ये ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी २०१८मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षी २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यासाठी करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वन व सामाजिक वनीकरण विभागातर्फे ३३४८७, इतर विभागातर्फे ४००२०, ग्रामपंचायतस्तरावर १,६९००० मिळून सध्या २ लाख ४२ हजार ५०७ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी विविध शासकीय विभाग तसेच लोकसहभाग वाढत असल्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड होण्याची शक्यता असून, तीन लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता जिल्हा वन अधिकारी विकास जगताप यांनी व्यक्त केली.
वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वन व सामाजिक विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात विविध योजनांतून रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. एकूण २१ रोपवाटिका असून, ७ लाख ५ हजार ३७३ रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
रोपे आपल्या दारी : सवलतीच्या दरात रोपांची उपलब्धता
सामाजिक वनीकरण विभागाच्या कळंबणी (खेड), पिंपळी (चिपळूण), झोंबडी-गिमवी (गुहागर), पूर, ताम्हाणे (संगमेश्वर), खानू (रत्नागिरी), गवाणे (लांजा), केळवडे (राजापूर), दहागाव (मंडणगड), कॅम्प दापोली नारगोली, टाळसुरे (दापोली) येथील रोपवाटिकांमध्ये शासकीय सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय चिपळूण वन विभागाच्या अंतर्गत खेरवसे, भांबेड (लांजा), पिंपळी (चिपळूण), निगुंडळ (गुहागर), दापोली, म्हाळुंगे (दापोली) येथील रोपवाटिकेत रोपे उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील लोकांना घराच्या परिसरामध्ये लागवडीकरिता रोपे सुलभतेने प्राप्त होतील, यासाठी २५ जूनपासून स्टॉल लावण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा येथे स्टॉल असून, त्याठिकाणी साग, जांभूळ, आवळा, सुरू तसेच शोभिवंत झाडांच्या रोपांचा पुरवठा वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात केला जाणार आहे.
वन महोत्सवाचा प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. लोकसहभाग मिळविण्यासाठी १ मे पासून चंद्रपूर येथून चित्ररथाला प्रारंभ झाला आहे. दि. २० जून रोजी रत्नागिरीत येणारा चित्ररथ २२ जूनपर्यंत जिल्ह्यात जनजागृतीसाठी फिरणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. बांदा येथे चित्ररथाची सांगता होणार आहे. याशिवाय ग्रामसभा, वृक्षदिंडी, पथनाट्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे.


 

Web Title: Planting of three lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.