खेड - पुरार रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:24+5:302021-06-18T04:22:24+5:30
मंडणगड : खेड - पुरार राज्य मार्गावर दुधेरे ते पालघर या दोन गावांच्या हद्दीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ...
मंडणगड : खेड - पुरार राज्य मार्गावर दुधेरे ते पालघर या दोन गावांच्या हद्दीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मंडणगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची निविदा न निघाल्याची माहिती बांधकाम विभागातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे यावर्षी रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
खेड - पुरार राज्यमार्ग हा तालुक्याचा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. जून महिन्यात पावसाने तालुक्यात आपले बस्तान बसविल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने दुचाकी, तीनचाकी व लहान वाहनांना या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे. यावर्षी बांधकाम हंगामात तालुक्यातील कुठल्याही महत्त्वाच्या रस्त्याचे डागडुजी वा खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागाने केलेले नाही. त्याचा त्रास तालुकावासीयांना भाेगावा लागत आहे.
-----------------------------------
मंडणगड तालुक्यातील कुंबळे - पालघर दरम्यान माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.