नांगरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:29+5:302021-06-11T04:22:29+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावस परिसरातील गोळप भागासह अन्य ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावस परिसरातील गोळप भागासह अन्य ठिकाणी भातशेतीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. काही भागात भातपेरणीसाठी नांगरणी सुरु असून, काही भागात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.
बियाणे वाटप
दापोली : येथील कोकण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे दत्तक खेड्यांमध्ये भात, नाचणी व भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. दत्तक खेड्यांच्या परिसरातील इतर गावांमध्येही या बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे.
पाणीटंचाई संपुष्टात
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी कडक उन्हामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सलग सुरु असलेल्या पावसामुळे पाण्याचे स्रोत पुन्हा भरले आहे. त्यामुळे आता सर्वच गावांमध्ये मुबलक पाणी पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.
वाहनांची कसरत
खेड : तालुक्यातील सवणस-अणसपुरे रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. सध्या या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करत जावे लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुर्दशा होणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
दापोली : तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीला साईसमर्थ सामाजिक संस्था, अंधेरी यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, चंद्रकांत बैकर तसेच साईसमर्थ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.