कोकणातील समुद्राला उधाण

By admin | Published: June 26, 2017 10:30 PM2017-06-26T22:30:32+5:302017-06-26T22:30:32+5:30

दापोली कोकणातील समुद्राला उधाण आले असून , समुद्राच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली

Plunge into the Konkan sea | कोकणातील समुद्राला उधाण

कोकणातील समुद्राला उधाण

Next

 ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. २६  दापोली  कोकणातील समुद्राला उधाण आले असून , समुद्राच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून  किनारपट्टीवरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

      दापोली तालुक्यातील मुरुड , कर्दे , लाडघर, तामसतीर्थ या ठिकाणी समुद्राच्या पाणी मानवी वस्ती कडे घुलेय , या पाण्यामुळे किनाऱ्यावरील  धूप प्रतिबंधक सुरुची  झाडे  उन्मळून पडली आहेत ,  तसेच मुरुड च्या समुद्र किनारा-याची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय , या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा  बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
      समुद्र किनाऱ्यावरील  काही गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत . कोकणात काल पासून दमदार पावसाने  सुरुवात केलीय , या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी अंशतः नुकसान झाले आहे .  एकंदरीतच या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. 

Web Title: Plunge into the Konkan sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.