पीएम किसान सन्मान निधी: शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम

By मेहरून नाकाडे | Published: December 19, 2023 06:38 PM2023-12-19T18:38:08+5:302023-12-19T18:38:28+5:30

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून ...

PM Kisan Samman Nidhi: Special campaign at village level to ensure that farmers are not deprived | पीएम किसान सन्मान निधी: शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम

पीएम किसान सन्मान निधी: शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहिमेला प्रारंभ झाला आहे. ही माेहिम दि.१५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जेणेकरून जानेवारीच्या शेवटच्या पीएम किसान योजनेचा प्रस्तावित १६ वा हप्ता वितरीत करण्याचे शासनाचे नियोजन आहे.

पी.एम.किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण एक ६५ हजार ३९९ लाभार्थी सहभागी आहेत. यामधील केवायसी प्रलंबित असलेले ७२०३, बॅंक आधारखाते सलग्न नसलेले१९७५७ तसेच भूमि अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले १०८६४ लाभार्थी प्रलंबित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात दि.२२ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील बॅंक आधारद सलग्न नसलेले, ई केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोदणी लाभार्थीची मान्यता प्रलंबित असलेले व वन स्टाॅप पेमंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.

आधार सिडींगसाठी पोस्ट खाते सामायिक सुविधा केंद्र व बॅंक व्यवस्थान मदतीने तर ई केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी व सामायिक सुविधा केंद्र यांचेमार्फत कार्यवाही केली जाणार आहे.

Web Title: PM Kisan Samman Nidhi: Special campaign at village level to ensure that farmers are not deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.