‘त्या’ दोघांचा चिपळूण पोलीस घेताहेत शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:31+5:302021-06-23T04:21:31+5:30

चिपळूण : चार दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या ...

The police are searching for the two | ‘त्या’ दोघांचा चिपळूण पोलीस घेताहेत शोध

‘त्या’ दोघांचा चिपळूण पोलीस घेताहेत शोध

Next

चिपळूण : चार दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेदरम्यान पीडित तरुणीने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केल्यानंतर दोघांकडे मदतीसाठी हात पसरले होते; परंतु या दोघांनीही तिला मदत केली नाही. मात्र, आता याप्रकरणी तपासाच्या दृष्टीने त्या दोघांची मोठी मदत होणार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेने संबंधित तरुणीचे कुटुंबही हादरले आहे. या तरुणीवर मानसिकदृष्ट्या झालेला आघात आजही कायम आहे. संबंधित तरुणीने या प्रसंगाविषयी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या नराधमाशी तिची अर्धा तास झटापट झाली. त्यानंतर पीडित तरुणीने नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. तेथून मदतीसाठी भोगाळेतील किंग बाजारच्या दिशेने धाव घेतली. याचवेळी भोगळे येथे चालत येणाऱ्या एका व्यक्तीला तिने त्याला हात जोडून मदतीची विनवणी केली व त्याला तितक्याच घाईघाईत झालेला प्रकारही सांगितला. यावेळी त्या व्यक्तीने नजीकच्या रिक्षावाल्याकडे बोट दाखवून त्यांना भेटायला सांगितले आणि ती व्यक्ती तेथून निघून गेली. त्यानंतर तिने रिक्षावाल्याला भेटून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा रिक्षावाल्यानेही नजीकच्या अपरांत हॉस्पिटलमध्ये तिला जाण्यास सांगितले.

एकीकडे अचानक आलेला प्रसंग आणि मदतीसाठी कोणीही तयार नसल्याचे पाहून ही तरुणी अक्षरशः भेदरली होती. मात्र, काही वेळातच तिचे नातेवाईक व त्यापाठोपाठ ती नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधील काही कर्मचारी तेथे पोहाेचले. तेव्हा ती काहीशी सावरली. मात्र, आता याप्रकरणी त्या दोन व्यक्तींची पोलिसांना मदत अपेक्षित असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या मदतीने पीडित तरुणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: The police are searching for the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.