पोलिसांचा गणपती बंदोबस्तातच संपला
By Admin | Published: September 4, 2014 11:22 PM2014-09-04T23:22:26+5:302014-09-04T23:28:20+5:30
सण असो की काही : पोलीस देत आहेत खडा पहारा
कुवे : गणेशोत्सव असो वा दिवाळी यासारखे सण असले तरी या सणामध्ये मात्र खाकी वर्दीतील पोलिसांना या गणेशोत्सवात साप्ताहिक सुट्टीही न घेता दिवस रात्र सेवा बजावावी लागत आहे.
पोलिसांना नेहमी क्षमतेपेक्षा काम करावे लागते. दिवस-रात्र राबावे लागते. त्यातच वाढत्याचोऱ्या आदींसह इतर गोष्टींवरती करडी नजर ठेवावी लागते. त्यामुळे या सणासुदीत पोलिसांना जादा काम करावे लागते. कुटुंबापासून अनेकवेळेला लांब राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. सणासुदीच्या या दिवसामध्ये त्यांना मिळणारी साप्ताहिक सुट्टीही रद्द करुन कामावरती हजर रहावे लागते. त्यामुळे या पोलिसांना या सणात मात्र दिवस-रात्र जागवून जनतेची सेवा करावी लागते. त्यामुळे या सणासुदीत जनतेची सेवा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवात आता कोकणात येणाऱ्या वाढत्या चाकरमान्यांमुळे सर्वत्र गर्दीचा माहोल असून त्यामधून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलिसांची नजर असून या उत्सवात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या गस्तीतही वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)
गणपती असो वा दिवाळी या सणाबरोबर इतरही सणात या पोलिसांना कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे पोलिसांना सतत कार्यमग्न रहावे लागणार आहे. त्यातच साप्ताहिक सुट्टीही या सणात मिळत्र नसल्याने या पोलिसांना सणासुदीत बाहेर रहावे लागते. तयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम दिसत आहे.
गणेश विसर्जन सोहळा पार पडला असला तरी हा उत्सव उत्तरार्धात येण्यास अद्याप काही कालावधी जाणार आहे. (वार्ताहर)
गणेशोत्सव असो की दिवाळी कोणत्याही सणात पोलीस कर्तव्य बजावत असतात. साप्ताहिक सुट्टी न घेता रात्रं दिवस पोलीस कर्तव्य बजावत आहेत. एकिकडे उत्साह तर दुसरीकडे जबाबदारी या दोन्हींचे भान ठेवून पोलीस आपली जबाबदारी चोख बजावत असतात. कर्तव्याने घडतो माणूस अशीच काहीशी परिस्थिती या खात्याची असते.