पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2016 10:28 PM2016-06-03T22:28:39+5:302016-06-04T00:40:34+5:30

अल्पवयीन मुलांची संख्या अधिक

Police raises the discovery of 775 missing people | पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

Next

आकाश शिर्के - रत्नागिरी --रत्नागिरी शहरात गेल्या १३ वर्षांत ८३७जण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असून, बेपत्ता असलेल्या ७७५ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरामध्ये बेपत्ता होण्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात होत आहेत. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या १३ वर्षांत एकूण ८३७जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात असून, त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. सन २०११मध्ये सर्वांत कमी ४७ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. सन २०१४मध्ये ९६जण बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ९४जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
सर्वांत जास्त बेपत्ताच्या नोंदी २००३ ते २०१५ या कालावधीत आहेत. ३०३ पुरूष व २८० महिला असे मिळून एकूण ५८३ स्त्री-पुरूष बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यातील अजूनपर्यंत ५२१ जणांना शोधण्यात यश आले. शोध घेतलेल्यांमध्ये स्त्रिया २७१ असून, २८० पुरुषांचा समावेश आहे. बेपत्ता होण्याच्या नोंदीमध्ये स्त्री - पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये एकूण सर्वाधिक ९६ बेपत्ता नोंदी झाल्या. सर्वांत कमी बेपत्ता नोंदी २०११मध्ये आहेत.
सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास सध्या अपहरणाचा गुन्हा पोलीस स्थानकात दाखल केला जातो. गेल्या १३ वर्षात शहरातील २५४ अल्पवयीन मुले - मुली बेपत्ता असल्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १५१ मुलगे असून, १०३ मुलींचा सामावेश आहे. त्यातील २४४ मुला - मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये १४२ मुले व १०२ मुलींचा सामावेश आहे. तेरा वर्षात एकूण ८३७ जण बेपत्ता झाले होते. त्यातील ७७५ जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत पोलीस स्थानकात अपुरे संख्याबळ असल्याचे दिसत आहे.

अपुरे पोलीसबळ
पोलीस स्थानकावर संपूर्ण शहर परिसराचा भार आहे. आता चालू वर्षात पोलीस स्थानकात २०० गुन्हे दाखल झाले असून, पोलीसबळ अद्याप ८८ इतकेच आहे. त्यामुळे शहर पोलीस स्थानकातील पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

सनबेपत्ताशोध
२००३६३५९
२००४७१६५
२००५५०४७
२००६६४६३
२००७७३६८
२००८६६५८
२००९८५६३
२०१०६७६०
२०११४७४५
२०१२४९४५
२०१३९६९४
२०१४५०४६
२०१५६६५६

Web Title: Police raises the discovery of 775 missing people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.