बारसू रिफायनरी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला
By अरुण आडिवरेकर | Published: April 28, 2023 12:36 PM2023-04-28T12:36:32+5:302023-04-28T12:37:19+5:30
बारसू रिफायनरी विरोधात बारसूच्या माळरानावर ग्रामस्थ एकत्र येणार
राजापूर : तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी विरोधात आज (२८ एप्रिल) मोर्चा निघणार आहे. बारसू रिफायनरी विरोधात बारसूच्या माळरानावर ग्रामस्थ एकत्र येणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी विरोधात निघणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा बारसूमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आम्ही त्यांच्याबरोबर असल्याचाही दावा करण्यात आला होता.
बारसू रिफायनरी विरोधातील मोर्चाचे बारसूच्या माळरानावर आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करणार असल्याचे सांगितले जात आहे. बारसूच्या माळरानावर ग्रामस्थ एकवटणार असल्याने याठिकाणी पाेलिसांचा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला पाेलिसांच्या छावणीचे स्वरुप आले आहे.