पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:33 PM2019-09-24T14:33:40+5:302019-09-24T14:34:34+5:30

मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातल्याची माहिती रत्नागिरीत येऊन धडकताच रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील शाखेच्या ग्राहकांनी बँकेत गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेच्या शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Police settlement outside Ratnagiri branch of PMC Bank | पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त

पीएमसी बँकेच्या रत्नागिरी शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त

Next
ठळक मुद्देपंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध रत्नागिरीतील मारूती मंदिर शाखेत ग्राहकांची गर्दी

रत्नागिरी : मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती रत्नागिरीत येऊन धडकताच रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील शाखेच्या ग्राहकांनी बँकेत गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेच्या शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अक्टमधील नियम ३५ अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेर बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बाध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, आरबीआय ने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत जमले आहेत. रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील शाखेत ग्राहकांनी सकाळपासून बँकेत येऊन चौकशी करण्यास सुरूवात केली. बँकेतून दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली असून, आमचे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बँकेमध्ये वाद सुरू झाले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेबाहेर आणि कार्यालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रिझर्व्ह बँकेने यासंदभार्तील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.

निबंर्धाच्या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खचासार्ठीही ठरावीक मयार्देपर्यंतच रक्कम खर्च करता येईल. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर रिझर्व्ह बँक पीएमसी बँकेबाबत पुढील निर्णय घेईल.
 

Web Title: Police settlement outside Ratnagiri branch of PMC Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.