लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पोलिसांच्या बदल्या

By अरुण आडिवरेकर | Published: January 17, 2024 09:31 PM2024-01-17T21:31:07+5:302024-01-17T21:31:15+5:30

मंगळवारी रात्री उशिरा हे बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

Police transfers in Ratnagiri, Sindhudurga in view of Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पोलिसांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पोलिसांच्या बदल्या

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर तेथील पोलिस निरीक्षकांच्या रत्नागिरी येथे बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे बदल्यांचे आदेश काढण्यात आले. 

रत्नागिरीतील भरत ज्ञानदेव धुमाळ, रत्नागिरी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप, संगमेश्वरचे सुरेश गावित, देवरुख पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, वैभववाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, देवगड पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची विशेष पोलिस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

पोलिस निरीक्षकांसोबतच जिल्ह्यातील १० सहायक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणचे रत्नदीप साळोखे यांची रत्नागिरी ग्रामीणला, चिपळूणच्या रुपाली पाटील यांची रत्नागिरी शहरला, दाभोळचे तुषार पाचपुते यांची चिपळूणला, अलोरेचे सुजित गडदे यांची लांजा पोलिस स्थानकात, रत्नागिरी ग्रामीणचे मनोज भोसले यांची देवरुखला, पूर्णगडचे विजय जाधव यांची जिल्हा वाहतूक शाखेत, लांजाचे प्रवीण देशमुख यांची चिपळूण येथे, नियंत्रण कक्षातील भरत पाटील यांची अलोरे येथे, जिल्हा वाहतूक शाखेतील सुधीर धायरकर यांची पूर्णगड येथे, स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल गोरे यांची दाभोळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ११ पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. चिपळूणमधील वंदना कनौजा यांची खेड तर पूजा चव्हाण यांची दापोली, गुहागर येथील पवन कांबळे यांची रत्नागिरी शहर, रत्नागिरी शहरचे प्रशांत जाधव यांची खेड, आकाश साळुंखे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, शांताराम महाले यांची चिपळूण पोलिस स्थानकात बदली करण्यात आली आहे. खेड येथील सुजित सोनावणे यांची गुहागरला, रत्नागिरी शहरच्या अनुराधा मेहेर यांची चिपळूण येथे, चिपळूण पोलिस स्थानकातील शाम आरमाळकर यांची रत्नागिरी शहरला, राजापूर पोलिस स्थानकातील शिल्पा वेंगुर्लेकर यांची चिपळूण येथे तर सावर्डे येथील धनश्री करंजकर यांची राजापूर पोलिस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

 

Web Title: Police transfers in Ratnagiri, Sindhudurga in view of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.