पोलीस व्हायचं होतं.. अपघातस्थळावर हादरले पोलीसही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:27 AM2018-11-27T10:27:07+5:302018-11-27T10:32:11+5:30

अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र,

Police wanted to become a police man | पोलीस व्हायचं होतं.. अपघातस्थळावर हादरले पोलीसही

पोलीस व्हायचं होतं.. अपघातस्थळावर हादरले पोलीसही

Next
ठळक मुद्देचरवेलीत अपघात : कोळशाच्या ट्रकखाली चिरडलेल्या स्वाराचे भयंकर दृश्य तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय

पाली : अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र, त्या ट्रकमधील कोळशाखाली कोणी आहे की नाही, हे समजत नव्हते. अचानक कोळशाखाली एक पाय दिसला आणि इतक्या अवजड ट्रकखाली एखादे वाहन किंवा व्यक्ती असल्यास त्याची अवस्था काय असणार, या कल्पनेनेच बघ्यांबरोबरच पोलीसही हादरले.

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे झालेला अपघात साºयांच्या जीवाचा थरकाप उडवून गेला. कोळसा वाहून नेणाºया चौदा चाकी ट्रकने ठोकरल्याने तीन दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. पलटी झालेल्या ट्रकमधला दगडी कोळसा महामार्गावर विखुरला होता. त्यामुळे पलटी झालेल्या ट्रकखाली कोणी सापडले आहे का, हे कळत नव्हते. चरवेली ग्रामस्थांनी पाली पोलीस दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राशी संपर्क  साधला.

वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी केली. त्यावेळी ट्रकखाली एक दुचाकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर कोळशाखाली तरुणाचा पाय दिसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ क्रेन मागवून पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यास सुरुवात केली. ट्रक जसजसा रस्त्यावर येऊ लागला तसतसा ट्रकमधील कोळसा त्या चिरडलेल्या तरुणाच्या अंगावर पडू लागला. त्यामुळे ट्रक खाली किती जण चिरडले गेले, याचा पोलिसांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी पोकलेन आणले व सर्व कोळसा रस्त्याच्या कडेला लोटून दिला. त्यानंतर मृत तरुणाला बाहेर काढण्यात आले. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी पाऊण तासाचा अवधी लागला. तो दुचाकीसह ट्रकखाली सापडल्याने त्याच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता तर त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्याच्याबरोबर असणारा त्याचा मित्र पाठी बसला होता. ट्रकची धडक बसल्यावर तो उडाल्याने बाहेर फेकला गेल्याने बचावला.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश यादव, पोलीस कर्मचारी अनिल गुरव, नाना सावंत, पाली दूरक्षेत्राचे रमेश गावीत, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैष्णवी यादव उपस्थित होते.

 

पोलीस व्हायचं होतं..

मृत श्रीकांतच्या पश्चात आई-वडील, दोन भावंडे असून, तो सर्वात लहान होता. त्याचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले होते व सद्यस्थितीत तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याच्या अधिक माहितीसाठी तो आणि त्याचा मित्र रत्नागिरी येथे निघाले होते. त्याची कौटुंबिक स्थिती अतिशय बेताची आहे.

भविष्य सांगणारे जखमी

अपघातात जखमी झालेले चारजण हे जळगावमधील असून, त्यांचा भविष्य सांगणे हा व्यवसाय आहे. त्यांचा तांडा काही दिवसांपूर्वी पाली येथे मुक्कामाला होता. हा मुक्काम सोडून ते चिपळूण येथे चालले होते. त्यांची एक चारचाकी गाडी पुढे गेली आणि बाकीचे सहा दुचाकीस्वार चालले होते. 

Web Title: Police wanted to become a police man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.