काेराेनाग्रस्तांच्या संपर्कातील नागरिकांचा पाेलीस मित्र घेणार शाेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:38+5:302021-06-09T04:39:38+5:30
खेड : तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्ण शोधणे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणेही गरजेचे आहे. हे काम ...
खेड : तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना रुग्ण शोधणे व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणेही गरजेचे आहे. हे काम गतीने व्हावे, यासाठी आरोग्य यंत्रणेने आता पोलीस मित्रांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून तालुक्यात निवडण्यात आलेले पोलीस मित्र आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत या कामी सक्रिय होणार आहेत.
खेड तालुक्यातील कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाबाधित यांचा संपर्क झालेल्या व्यक्ती शोधणे गरजेचे आहे. तालुक्याचा संपर्क शोधण्याचे प्रमाण केवळ ४ टक्के इतके असल्याने साथ आटोक्यात येताना दिसत नाही. एका रुग्णाचा संपर्क झालेल्या वीस ते पंचवीस लोकांची तपासणी होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कोरोना साथ थांबविण्यासाठी आता तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस मित्रांची नियुक्ती केली आहे.
त्यामध्ये अहमद दाऊद बांगी( हेदली), हकीम सिराज तांबे (अलसुरे), मोहिद्दीन मोहम्मद शेख (खेड), जमील युसूफ परकार (खेड), आनंद गोविंद खेडेकर (खेड तळा), गफ्फार उमर खेडेकर (भोस्ते), तस्वऊर सलीम रावल (अलसुरे), अफ्फाक सिराज महाडिक (अलसुरे), राहील हिदायत दळवी (साखरोली), उसामा ग्यासुद्दीन नाडकर (संगलट), फैज अब्दुल अझीझ रुमाने (खेड), कलाम रशीद बागवान (भोस्ते), मुखतार अब्दुल करीम सुर्वे (भोस्ते) आदींचा समावेश आहे. हे पोलीस मित्र कुराश संलग्न पोलीस मित्र संघटनेच्या खेड तालुका शाखेचे सदस्य आहेत. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णाच्या संपर्क झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्यामध्ये स्थानिक पोलीस मित्र आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करणार आहेत.