सरपंचपदासाठी राजकीय जुळवाजुळव
By admin | Published: April 13, 2016 09:53 PM2016-04-13T21:53:01+5:302016-04-13T23:23:24+5:30
साऱ्यांचे लक्ष : ४८ ग्रामपंचायतींमध्ये हालचाली सुरु
रत्नागिरी : जिल्ह्यात जानेवारी ते जून -२०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी डिसेंबरमध्ये मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींची सरपंचपदाची निवड येत्या २१ व २२ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला सरपंच यावा, यासाठी राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये मंडणगड २, दापोली ४, संगमेश्वर ३, खेड ७, चिपळूण १, गुहागर ४, रत्नागिरी ३, लांजा १५, राजापूर ९ अशा ४८ ग्रामपंचायतींचा समावेश होता.या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची येत्या २१ आणि २२ रोजी निवड करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी याआधीच आरक्षण काढण्यात आले असल्याने आता केवळ सरपंचपद निवड जाहीर केली जाणार आहे.मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार, याविषयी तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. आपला सरपंच बसावा, यासाठी विविध राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)
सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायती तालुकाग्रामपंचायती
मंडणगड (२)घराडी, निगडी
दापोली (४)नवसे, इनामपांगारी, फणसू, गावतळे
खेड (७)सुसेरी, तळघर,वडगाव, देवघर, नांदगाव, आस्तान, असगणी
चिपळूण (१)पोफळी.
गुहागर (४)अंजनवेल, वेळंब, चिंद्रावळे, पालशेत
रत्नागिरी (३)फणसोप, शिरगाव, पोमेंडबुद्रुक.
लांजा (१५)वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, कोलधे, रिंगणे,
शिरवली, व्हेळ, गवाणे, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, उपळे,
गवाणे, प्र्रभानवल्ली,
राजापूरमोगरे, वडदहसळ, मूर, आंगले, राजवाडी, देवाचे गोठणे,
भालावली, केळवली, सागवे.
एकूण४८