राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही : नितीन गडकरी

By अरुण आडिवरेकर | Published: March 30, 2023 06:03 PM2023-03-30T18:03:59+5:302023-03-30T18:04:20+5:30

श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय इमारतीचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

Politics is not about power says Nitin Gadkari | राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही : नितीन गडकरी

राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही : नितीन गडकरी

googlenewsNext

रत्नागिरी : राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. समाजाची सेवा करणे, दलित, पीडित, शाेषित समाजाची सेवा करणे, गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करणे, जनतेचे कल्याण करणे हा खरा राजकारणाचा अर्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाणीज (ता. रत्नागिरी) येथे केले.

श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी (३० मार्च) मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. व्यासपीठावर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, प. पू. कानिफनाथ महाराज, राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमाेद जठार, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घाेसाळकर उपस्थित हाेते.

गडकरी पुढे म्हणाले की, महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात महाराजांनी कार्य केले आहे. गरीबाच्या मुलाला शिक्षण मिळावे यासाठी महाराजांनी संस्थानाच्या माध्यमातून कार्य केले आहे. ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे या प्रयत्नातून महाराजांनी शिक्षण संकुलाची निर्मिती केली आहे. या ठिकाणाहून भविष्यातील उत्तम नागरिक तयार हाेतील, ते केवळ जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाही तर भारताचे नाव जगात माेठ करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्माच रक्षण करण्याचे माेठ काम महाराजांनी केले आहे.

महाराजांनी सर्व दृष्टीने समाजाच्या कल्याणाचा मार्ग संस्कारातून, मूल्यातून, मार्गदर्शनातून, प्रशिक्षणातून, प्रवचनातून सर्वांना दिला आहे. जनतेचा, माेठ्या माणसांचा आशीर्वाद ही आयुष्यातील माेठी पुंजी असते. दीन, दुर्बल, दु:खी लाेकांचे अश्रू पुसण्याकरता, समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता, कार्य करण्याकरता शक्ती द्या, असे शेवटी गडकरी म्हणाले.

Web Title: Politics is not about power says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.