आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:40+5:302021-08-15T04:32:40+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे. गुहागर आबलोली मार्गे आवरे, असोरे, ...
आबलोली : गुहागर तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहने चालविणे जिकिरीचे बनले आहे.
गुहागर आबलोली मार्गे आवरे, असोरे, शिवणे, कोळवली, भातगाव हा रस्ता गेली कित्येक वर्षे दयनीय अवस्थेत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक नाइलाजास्तव शिवणेमार्गे अन्य रस्त्यावरून प्रवास करत आहेत. हा रस्ता अंतर आणि वेळेच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे.
आवरे भातगाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. साईडपट्टी खराब झाली आहे. त्याचा त्रास वाहन चालक, प्रवासी, पर्यटक यांना सहन करावा लागत आहे. याच मार्गावर कोळवली हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परिसरातील दुर्गम भागातील जनता याठिकाणी उपचारासाठी येते मात्र त्यांनाही या नादुरुस्त रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. २० दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, त्यापूर्वी रस्त्याची तात्पुरती का होईना डागडुजी होणे गरजेचे आहे. संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रस्त्यालगत असलेल्या गावातील ग्रामस्थ आग्रही आहेत.