गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लोकसंख्या दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:40+5:302021-07-21T04:21:40+5:30

रत्नागिरी : जागतिक लोकसंख्यादिनाचे औचित्य साधून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळ, आय.क्यू.ए.सी. विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ...

Population Day celebrated at Gogte-Joglekar College | गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लोकसंख्या दिन साजरा

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लोकसंख्या दिन साजरा

Next

रत्नागिरी : जागतिक लोकसंख्यादिनाचे औचित्य साधून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी मंडळ, आय.क्यू.ए.सी. विभाग आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने पोस्टर स्पर्धा, रांगोळी तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेतील निबंध स्पर्धेसाठी ‘जागतिक लोकसंख्या’ हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांकडून स्वहस्ताक्षरातील निबंध मागविण्यात आले. प्रथम क्रमांक कल्पेश पारधी, द्वितीय क्रमांक प्रियांका कीर, तृतीय क्रमांक अन्विक्षा थोरात, तर उत्तेजनार्थ सुहानी गुरव हे विजेते ठरले.

पोस्टर आणि रांगोळी स्पर्धेकरिता जागतिक लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि अर्थव्यवस्था हे विषय देण्यात आले. प्रथम क्रमांक सागर करंजवकर, द्वितीय क्रमांक कुणाल कीर, तृतीय क्रमांक अवनी कोळंबेकर हे स्पर्धेचे विजेते ठरले.

वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सीमा कदम, विद्यार्थी मंडळाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, शिक्षक समन्वयक डॉ. मीनल खांडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाची जनरल सेक्रेटरी बुशरा खान आणि सायमा कापडी यांनी मदत केली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शक आणि स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Population Day celebrated at Gogte-Joglekar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.