बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, कोकणातील आंबा बागायतदारांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:12 AM2022-03-23T11:12:10+5:302022-03-23T11:14:54+5:30

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच ...

Possibility of cyclone in Bay of Bengal, crisis on mango growers in Konkan | बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, कोकणातील आंबा बागायतदारांवर संकट

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, कोकणातील आंबा बागायतदारांवर संकट

googlenewsNext

दापोली : बंगालच्या उपसागरात 'असानी चक्रीवादळ' निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. या चक्रीवादळापूर्वीच कोकणात गेले काही दिवस ढगाळ वातावरण पसरल्याने आंबा पिकावर मोहर करपा व फळगळ सारखी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीकाचे नुकसान होण्याची भिती बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, खेड, राजापूर या परिसरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यप्रकाश नसल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरणातील या बदलामुळे आंब्यावरील मोहोर काळवंडला असून फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोकणात वारंवार येणारे चक्रीवादळ व बदलते हवामान याचा आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे, बागायतदार शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांना मात्र सरकारकडून दिलासा मिळत नाही.

Web Title: Possibility of cyclone in Bay of Bengal, crisis on mango growers in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.