गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:54+5:302021-04-17T04:30:54+5:30

- उंची ७२.७० मीटर - प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर - पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर - २०१३ /१४ साली ...

Power generation work on Gadnadi dam postponed | गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

गडनदी धरणातील वीजनिर्मितीचे काम लांबणीवर

Next

- उंची ७२.७० मीटर

- प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमता ३१११ हेक्टर

- पीकक्षेत्र ४२९६ हेक्टर

- २०१३ /१४ साली ५ हेक्टर सिंचन

- सन २०१४/१५ २ हेक्टर सिंचन

- सन २०१५/१६ साली २ हेक्टर सिंचन

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. गडनदी धरणावर १.६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. अद्याप या कामाला सुरुवात नसली तरी प्रकल्पाची रचना करताना वीजनिर्मिती प्रकल्प करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, संध्या बंदिस्त नलिकेचे काम सुरू असल्याने वीजनिर्मितीचे काम लांबणीवर पडले आहे.

गडनदी धरणाला २० ऑगस्ट १९८३ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यावेळी प्रकल्पाची किंमत १०.३७ कोटी एवढी होती. त्यानंतर प्रकल्प खर्चात वाढ होत गेली आणि २५ फेब्रुवारी २००० रोजी १२२.८० कोटी रुपये किमतीला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ५ सप्टेंबर २००९ रोजी द्वितीय प्रशासकीय मान्यता देत प्रकल्पाची किंमत ४१९.८१ कोटींवर गेली. २७ सप्टेंबर २०११ रोजी ६५१.४२ कोटींच्या रकमेला तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ९२५.७६ कोटींना चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

गडनदी धरणाच्या दोन्ही बाजूने कालवे काढण्यात आले आहेत. डावा कालवा २७ किलाेमीटरपर्यंत मातीकाम करण्यात आले आहे. मात्र बंदिस्त पाइपलाइनमुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडला आहे. पाईपलाइनमुळे या कालव्याची लांबी २२.०७ किलाेमीटर राहणार आहे. उजवा कालवा ४७ किलाेमीटर एवढा आहे. मात्र, आता कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत त्यामुळे या कालव्याच्या लांबीत फरक पडल्याची माहिती कालवे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दीपक जोशी यांनी दिली आहे.

..................................

उजव्या कालव्या अंतर्गत २५०० हेक्टर पीकक्षेत्र आहे तर १७८६ आयसीए उजवा कालवा चिपळूण तालुक्यातील कुटरे, येगाव, नांदगाव खु., नांदगाव बु., कुशिवडे, असुर्डे, कोकरे, नायशी, वडेरु, खेरशेत, तर संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी, कळंबुशी, कासे, आसवे आदी गावांमधून जातो तर डावा कालवा आरवली, कोंडीवरे, बुरंबाड, सरंद, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे आदी गावांमधून जातो यापैकी बहुतांश कामे हे अपूर्ण अवस्थेत आहेत.

............................

गडनदी धरण प्रकल्प कालव्यासंदर्भात स्थानिकांच्या मनात संभ्रम आहेत. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करत असताना जो चर खणला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असलेल्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र शेतीच्या नुकसानाबद्दल कोणी बोलायला तयार नाही.

- संतोष येडगे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Power generation work on Gadnadi dam postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.