लाेटे वसाहतीतील वीज पुरवठा भूमिगत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:37 AM2021-09-07T04:37:38+5:302021-09-07T04:37:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा भूमिगत जोडण्यात येणार असून, मार्च २०२२पूर्वी हे ...

The power supply to the Latte colony will go underground | लाेटे वसाहतीतील वीज पुरवठा भूमिगत करणार

लाेटे वसाहतीतील वीज पुरवठा भूमिगत करणार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा भूमिगत जोडण्यात येणार असून, मार्च २०२२पूर्वी हे काम पूर्ण करणार असल्याची माहिती कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिली आहे.

लोटे परशुराम इंडस्ट्रिज असोसिएशनने औद्योगिक वसाहतीच्या वीजपुरवठा प्रश्नासंदर्भात वीज बिल न भरता आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरण कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या सूचनेनुसार उद्योजकांची अधिकाऱ्यांबरोबर लोटे येथील उद्योग भवन येथे सभा पार पडली. या सभेत अधीक्षक अभियंता सायनेकर यांनी माहिती दिली. यामध्ये १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे सुरुवात झाली असून, केवळ औद्योगिक वसाहतीसाठी आठ कर्मचारी देण्याचे मान्य केले गेले आहे. या सभेला कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्यासह असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी, सचिव ॲड. राज आंब्रे, संस्थापक अध्यक्ष सुनील शिर्के, कुंदन मोरे, विश्वास जोशी, किसन चव्हाण, रवी कुलकर्णी व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सांगितले की, वसाहतीतील कंडक्टर वारंवार तुटतात. त्यामुळे अखंड वीजपुरवठा होत नाही. यासाठी संपूर्ण वसाहतीमध्ये भूमिगत वीजवाहिन्या जोडाव्यात. औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र सेक्शन ऑफिस सुरू करावे, केवळ औद्योगिक वसाहतीसाठीच कर्मचारी नियुक्त करावे, सहाय्यक अभियंता कार्यालय लोटे येथे सुरू करण्याचे आदेश असतानाही ते खेड येथे सुरू आहे ते लोटे येथे असावे, टेस्टिंग युनिट मंजूर झाले आहे ते सुरू करावे, या मागण्या केल्या. या सर्व मागण्या पूर्ण होतील. सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होतील, उद्योजकांनी आंदोलन करू नये, असे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांनी सांगितले. त्यामुळे विद्युत मंडळाच्या विरोधातील आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे, असे संघटनेचे सचिव ॲड. राज आंब्रे यांनी सांगितले.

Web Title: The power supply to the Latte colony will go underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.