राजापुरात टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:33 AM2021-05-19T04:33:12+5:302021-05-19T04:33:12+5:30

राजापूर : ताैक्ते वादळाच्या जोरदार तडाख्यानंतर प्रदीर्घ काळ खंडित झालेला राजापूर शहरासह बहुसंख्य तालुक्यातील विद्युत पुरवठा सोमवारी सायंकाळनंतर टप्प्याटप्प्याने ...

Power supply in Rajapur is phased out | राजापुरात टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

राजापुरात टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत

Next

राजापूर : ताैक्ते वादळाच्या जोरदार तडाख्यानंतर प्रदीर्घ काळ खंडित झालेला राजापूर शहरासह बहुसंख्य तालुक्यातील विद्युत पुरवठा सोमवारी सायंकाळनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात वितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले़; मात्र तरीही तालुक्यातील अन्य काही भागातील पुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारीही काही भाग अंधारात हाेता.

वादळामुळे विद्युत वितरणमधील अचानक उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बहुतांशी तालुका अंधारात बुडाला होता़ ओणी येथील ३३ केव्हीच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाला होता; तर त्यानंतर आलेल्या जोरदार वादळामुळे तर विविध ठिकाणचे विद्युत खांब उन्मळून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता़. परिणामी प्रदीर्घकाळ वीजपुरवठा बंद होता़. शासकीय कार्यालयांसह रुग्णालये येथील कामकाजावर परिणाम झाला होता़. रायपाटण येथील कोविड सेंटरमधील रुग्णांवर उपचार करताना तेथील आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

वादळामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असतानाच, विद्युत वितरणचे कर्मचारी मात्र अहोरात्र कार्यरत होते़. ओणी सबस्टेशनसह विविध ठिकाणी झालेल्या पडझडीमुळे नेमका दोष कुठे आहे, याचा शोध घेणे सुरू होते़. सोमवारी दुपारनंतर वितरणच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणचे निर्माण झालेले तांत्रिक दोष दूर केले़. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्युत पुरवठा सुरू करण्यात वितरण विभागाला यश आले़

राजापूर शहराचा सायंकाळी पुरवठा सुरू झाला होता़, तर त्याचवेळी तालुक्याच्या पूर्व परिसराचाही पुरवठा सुरू करण्यात यश आले होते़. याव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही वीजपुरवठा सुरू झाला होता़ मात्र, तालुक्याच्या अन्य भागात झालेली पडझड व त्यातूनच वितरणचे नुकसान झाल्याने त्या परिसरातील पुरवठा सोमवारीही सुरू झाला नव्हता़. मंगळवारी वितरणचे कर्मचारी तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू व्हावा म्हणून कार्यरत होते.

Web Title: Power supply in Rajapur is phased out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.