काेकण नमन कलामंच जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:44+5:302021-03-26T04:30:44+5:30

फोटो : रत्नागिरी : जिल्हास्तरावर स्थापन झालेल्या कोकण नमन कलामंच, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड ...

Prabhakar Kamble as District President of Kaekan Naman Kalamanch | काेकण नमन कलामंच जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे

काेकण नमन कलामंच जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे

Next

फोटो :

रत्नागिरी : जिल्हास्तरावर स्थापन झालेल्या कोकण नमन कलामंच, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल रवींद्र मटकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीधर खापरे, मोहन घडशी, शाहीद खेरडकर उपस्थित हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील नमन या लोककलेचे कलावंत संघटित नसल्याने या चळवळीपासून दूर होते. पण आता या कलेला शासनदरबारी राजाश्रय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सारे नमन कलावंत आता कोकण नमन कलामंच, महाराष्ट्र राज्य या एकाच झेंड्याखाली आले आहेत. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुकावार नमन लोककलावंतांच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. या सर्व शाखांच्या माध्यमातून जिल्हा संघटन उभे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा बैठक प्रत्येक तालुक्यातील काही निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत रत्नागिरीत पार पडली.

त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर या संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर नमन या लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रथमच या संघटनेच्या माध्यमातून २३ सदस्यीय जिल्हास्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेवर जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी मोहन घडशी (लांजा) व युयुत्सु आर्ते (देवरुख) यांची निवड झाली. त्याचप्रमाणे सरचिटणीसपदी रवींद्र मटकर (राजापूर), चिटणीसपदी संतोष कुळे (चिपळूण), खजिनदारपदी सुधाकर मास्कर (गुहागर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या संघटनेच्या सदस्यपदी विजय मांडवकर, परशुराम मासये, अशोक डोंगरकर (राजापूर), चंद्रकांत पालकर, गजानन तटकरी (लांजा), प्रदीप भालेकर, नितीन बंडागळे, कृष्णा जोगळे (संगमेश्वर), विश्वनाथ गावडे, विलास भातडे, सुरेश दसम (रत्नागिरी), जगन्नाथ शिंदे, प्रमोद घुमे (गुहागर), सुनील बळकटे, भिकाजी भुवड (चिपळूण), झयाजी वीर, शाहीद खेरटकर (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे.

बैठकीला श्रीधर खापरे, शिवाजी मासये, सुरेश होरंबे, भिकाजी भुवड, सुधाकर मास्कर, दिलीप तांडकर, नितीन बंडागळे उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक अरुण कळंबटे यांनी, तर सूत्रसंचालन विश्वनाथ गावडे यांनी केले.

Web Title: Prabhakar Kamble as District President of Kaekan Naman Kalamanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.