‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 06:45 PM2018-07-04T18:45:26+5:302018-07-04T18:47:43+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार केला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Prasad Lad: Preparations for Assembly elections in 'Graduate' elections: BJP from Ratnagiri? | ‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ?

‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ?

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रचार पदवीधरचा, तयारी विधानसभेचीविधानसभेसाठी इच्छुकांचाही पदवीधर प्रचारात वाढला उत्साह

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार केला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सध्या सेनेचे सदानंद चव्हाण , उदय सामंत व राजन साळवी हे तीन, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संजय कदम आणि भास्कर जाधव हे दोन आमदार आहेत. या दोन्ही पक्षांचे जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलेच वर्चस्व आहे.

आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. राज्यातील सेना-भाजप युतीमधील बेबनावाची स्थिती पाहता मुदतपूर्व निवडणुकांची शक्यताही नाकारता येणार नाही. या स्थितीत जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघावरील पकड घट्ट ठेवण्याचे जोरदार प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही विद्यमान आमदार व २०१९मधील उमेदवारीसाठी इच्छुकांसाठी मोठीच पर्वणी ठरल्याची चर्चा आहे. आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पदवीधरच्या निवडणूक प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. अर्थात कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक व पदवीधर निवडणूक ही सर्व पक्षांसाठी विधानसभेच्या तयारीसाठी मोठी संधी होती.

रत्नागिरी मतदारसंघात आमदार सामंत यांनी त्यांची पकड मजबूत केलेली आहे. परंतु पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे २०१९च्या निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केल्याचीही चर्चा आहे.

दापोली-खेडचे आमदार संजय कदम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनीही या निवडणुकीच्या निमित्ताने पदवीधरच्या उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीची तयारीही केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक मोठ्या घटना, फेरबदलांची शक्यता असून, विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.

नाणारची डोकेदुखी

नाणारची डोकेदुखी असली तरी पदवीधर निवडणुकीत आमदार राजन साळवी यांनी राजापूरमध्ये पाय घट्ट रोवण्याचे प्रयत्न केले आहेत.

‘डाव’ त्यांचा, प्रचार यांचा!

पदवीधरमध्ये डावपेच कोणाचे व ते खरे ठरविण्यासाठी उमेदवाराच्या प्रचारात आपलाही प्रचार काहींनी केल्याची चर्चा आहे.

Web Title: Prasad Lad: Preparations for Assembly elections in 'Graduate' elections: BJP from Ratnagiri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.