एम.एस्सी.साठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:14+5:302021-07-14T04:36:14+5:30
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरामध्ये विद्यमान शैक्षणिक वर्षासाठी (२०२१-२२) ‘प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया’ सुरू झाली आहे. प्रवेशपूर्व नोंदणीनंतर प्राप्त ...
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरामध्ये विद्यमान शैक्षणिक वर्षासाठी (२०२१-२२) ‘प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया’ सुरू झाली आहे. प्रवेशपूर्व नोंदणीनंतर प्राप्त गुण व आरक्षण आधारित गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत.
रत्नागिरी उपपरिसरामध्ये एम. एस्सी. केमिस्ट्री, एन्विरोंमेंटल सायन्स, झुलॉजी, तसेच मास्टर्स इन सोशल वर्क, असे चार विभाग आहेत. यामधे केमिस्ट्री विभागात ऑरगॅनिक, इनोरगॅनिक, फिजिकल आणि अॅनालिटीकल, तसेच झुलॉजीमध्ये ओशोनोग्राफी अँड फिशरी सायन्स, असे स्पेशलायझेशन आहे.
उपपरिसराचा मास्टर्स इन सोशल वर्क (एमएस डब्ल्यू) हा विभाग कुडाळमध्ये सुरू आहे. या विषयांचा अभ्यासक्रम हा चार सत्रांत चालणार असून, प्रथम वर्षात दोन व द्वितीय वर्षात दोन अशी सत्रे असणार आहेत. एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी अधिक माहितीकरिता उपकेंद्रातील संबंधित व्यक्तींशी संपर्क साधावा.