रिफायनरीविरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By मनोज मुळ्ये | Published: April 28, 2023 12:55 PM2023-04-28T12:55:08+5:302023-04-28T16:21:05+5:30
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यातील वातावरण तापले
विनोद पवार
राजापूर : तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याची तयारी करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली.
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे. मंगळवारी काम सुरू होताना पहिल्या दिवशी झालेल्या रस्त्यावरील आंदोलनानंतर ग्रामस्थ केवळ ठिय्या करत होते. खासदार राऊत यांनी दिलेल्या भेटीनंतर आता या आंदोलनाने पुन्हा उचल घेतली आहे.
आज शुक्रवारी बारसू येथे मोर्चा काढण्याची तयारी झाली होती. यासाठी खासदार राऊत, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख सदा सरवणकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रानतळे येथे एकत्र झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशोक वालम यांना मुलासह अटक
जमावबंदी आदेश माेडल्याच्या आराेपावरून रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम आणि त्यांचा मुलगा विनेश वालम या दाेघांना पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईमुळे रिफायनरी विराेधकांमध्ये जाेरदार चर्चा सुरु झाली आहे.
रिफायनरी विरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात#VinayakRaut#NanarRefinerypic.twitter.com/bxRHWQc0Ji
— Lokmat (@lokmat) April 28, 2023