चिपळुणात अनेक दिवसांनी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:25+5:302021-07-12T04:20:25+5:30
चिपळूण : गेल्या अकरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, रविवारी दुपारपासून शहरासह तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात ...
चिपळूण : गेल्या अकरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, रविवारी दुपारपासून शहरासह तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील महिन्याच्या सुरुवातीला हवामान खात्याने अततिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीने हुलकावणी दिली होती. त्यानंतर काही दिवस शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी लावली होती. त्यामुळे वाशिष्ठी आणि शिवनदीतील पाण्याची पातळी वाढली होती; परंतु १ जुलैपासून पावसाने पूर्णतः पाठ फिरविली होती. त्यामुळे काही ठिकाणी भात लावणीची कामे अर्ध्यावरच रखडली होती, तसेच उन्हामुळे रोपे पिवळी पडली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.