गुहागरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:25+5:302021-05-16T04:31:25+5:30
गुहागर : तालुक्यात शनिवारी दुपारी ४.१५ वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर पाऊस कमी आला. सायंकाळी उशिरापर्यंत ...
गुहागर : तालुक्यात शनिवारी दुपारी ४.१५ वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर पाऊस कमी आला. सायंकाळी उशिरापर्यंत तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली नव्हती.
गेले दोन दिवस जिल्हा प्रशासनाकडून १५ व १६ मे रोजी वादळी पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुहागर नगरपंचायतीच्या माध्यमातून संभाव्य वादळाबाबत माहिती देण्यात येत होती. तसेच किनारपट्टीच्या भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला. शनिवारी दुपारी ४.१५ वाजल्यापासून पहिली १५ मिनिटे पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यानंतर विजेच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर थोड्या अंतराने पुन्हा पावसाची रिपरिप सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. तहसील कार्यालयात अद्याप तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.