मंडणगडात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:47+5:302021-09-08T04:38:47+5:30
मंडणगड : जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असतानाच मंडणगड तालुक्यातील विविध भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला. तहसील कार्यालयाने ...
मंडणगड : जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असतानाच मंडणगड तालुक्यातील विविध भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला.
तहसील कार्यालयाने घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार मंडणगड महसूल मंडलात ५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. म्हाप्रळ येथे ४ मिलीमीटर, देव्हारे ३८ मिलीमीटर, वेसवी येथे सर्वाधिक १६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण पावसाची सरासरी २१३ मिलीमीटर इतकी आहे. ७ सप्टेंबर अखेर तालुक्यात एकूण ३५७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साेमवारी रात्रीपासून वेसवी परिसरात पावसाने हजेरी लावली हाेती. मंडणगडमध्ये मात्र शांतता होती. शेवरे या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबीसह शेवरी येथे दरड दूर करण्याचे काम करत हाेते. त्याचबरोबर बाणकोट रस्त्यावर पडलेली झाड वाहतुकीस अडचणी निर्माण होऊन नये म्हणून ग्रामस्थांनी स्वतःच बाजूला केली.