विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 16:27 IST2021-06-21T16:24:56+5:302021-06-21T16:27:13+5:30

SureshPrabhu dapoli Ratnagiri : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

Preserve Konkan in development: Suresh Prabhu | विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभू

ठळक मुद्देविकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा : सुरेश प्रभूकोकणचा शाश्वत विकास परिसंवादाला प्रतिसाद

दापोली : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोकणचा शाश्वत विकास या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.

पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, गद्रे मरिन्सचे दीपक गद्रे, प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन, उद्योजक जयंत देसाई, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, डॉ. प्रकाश शिंगारे सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, अभ्यासक डॉ. दीपक आपटे, डॉ. उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे मिहीर महाजन, दीपक महाजन यांनी संयोजन केले. ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते. व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे, संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया, असे प्रभू म्हणाले.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ संजय सावंत म्हणाले की,नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवले पाहिजे. कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे. चाकरमानी माणसांना गावाशी जोडून ठेवले पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून पिके घेतली पाहिजे, असे सांगितले.
 

Web Title: Preserve Konkan in development: Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.