‘आपणा सर्वांना माझा नमस्कार’, राष्ट्रपतींनी केले मराठीतून अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:15 PM2022-02-12T14:15:10+5:302022-02-12T14:33:00+5:30
राष्ट्रपतींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
मंडणगड : ‘आपणा सर्वांना माझा नमस्कार’ असे मराठीतून अभिवादन करत राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राष्ट्रपती यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद शनिवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळगाव असलेल्या आंबडवे गावाला भेट देण्यासाठी आले हाेते. यावेळी आयाेजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, ‘आज राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डाॅ. भीमराव आंबेडकर यांचे वडिलाेपार्जित गाव आंबडवेच्या धरतीवर येऊन त्यांच्या अस्थिकलशाची पूजाकरण, भगवान बुद्ध तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर, रामजी सकपाळ व रमाबाई आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण, मी माझे साैभाग्य मानताे.’ असे सांगून त्यांनी आपले भाषण सुरु केले.