चिपळुणात भाजीचे दर घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:57+5:302021-05-05T04:50:57+5:30
चिपळूण : भाजीची आवक वाढली असून, दर मात्र चांगलेच गडगडले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या ग्राहकांनी भाजी खरेदीकडे ...
चिपळूण : भाजीची आवक वाढली असून, दर मात्र चांगलेच गडगडले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या ग्राहकांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरविली असल्याने दर कमी करण्याशिवाय पर्याय नाही. महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी व्यापारी संघाने शनिवारपासून भाजी व्यापार सुरू केला असला तरी कमी मागणीमुळे दर घटले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात १७ एप्रिलपासून भाजी व्यापार पूर्णपणे बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. भाजी बाजार बंद असल्याने काही किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दामदुप्पट दराने भाजी विकून ग्राहकांना वेठीस धरले होते. आता चिपळूणमधील सर्व भाजी व्यावसायिक सकाळी ७ ते ११ या वेळेतच आपली दुकाने सुरू ठेवत आहेत. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, पुढील दोन दिवस ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे. ग्राहकच नसल्याने या मालाचे करायचे काय, असा प्रश्न होलसेल व्यापाऱ्यांपुढे पडला असून, त्यांनी कमी दरात भाजी विक्री सुरू केली आहे.