प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक लस हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:59+5:302021-04-22T04:31:59+5:30
चिपळूण : सध्या काेरोनाचा विळखा वाढत आहे. अशावेळी ग्रामस्थ लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येत आहेत. परंतु, तेथे लसीचा मोठा ...
चिपळूण : सध्या काेरोनाचा विळखा वाढत आहे. अशावेळी ग्रामस्थ लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येत आहेत. परंतु, तेथे लसीचा मोठा साठा नसल्याने ग्रामस्थांना वारंवार परत जावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
कोराेनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही वाढत आहे. चिपळूण तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. येथे केवळ पाच लस दिल्या जातात, त्याचा लाभ ५० लोकांना मिळतो. आता ही संख्या वाढणे गरजेचे आहे. येथे दिवसाला किमान १५० लस दिल्यास ग्रामस्थांची सोय होईल, असे मुकादम यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्या उन्हाळा तीव्र असल्याने ग्रामस्थांना घराबाहेर पडणे अवघड असते. त्यातच ८ ते १० गावांना एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. तेथे जाण्यासाठी वाहन व्यवस्थाही नसते. अनेक गावात चालत जावे लागते. याबाबत गांभीर्याने विचार करून येथे लस वाढवून द्याव्यात, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.