दापाेलीतील प्राथमिक शिक्षकांनी केला काेविड याेद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:23+5:302021-05-16T04:31:23+5:30
दापोली : वर्षभरात कोविडने निधन झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे जोखमीचे काम करणारे दापाेली नगरपंचायतीचे कर्मचारी, गेले वर्षभर तुटपुंज्या मानधनावर ...
दापोली : वर्षभरात कोविडने निधन झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे जोखमीचे काम करणारे दापाेली नगरपंचायतीचे कर्मचारी, गेले वर्षभर तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या हाेमगार्डचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला़ तसेच त्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
कोविड केअर सेंटर दापोली (किसान भवन) येथे रुग्णांना गरम पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने संघटनेतर्फे गरम, गार व साधे पाणीपुरवठा करणारे वॉटर डिस्पेन्सर भेट देण्यात आला़ आरोग्य अधिकारी डाॅ़ मारकड यांनी सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले़ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष परवीन शेख, मुख्याधिकारी यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले़ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनीही या कामाचे काैतुक केले़
दापोली शिक्षण विभागातील कर्मचारी यांनाही कोरोना प्रतिबंधक साहित्याचे किट देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी हाेण्यासाठी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी विशेष परिश्रम केले. तालुका शाखेचे अध्यक्ष जीवन सुर्वे, सचिव सचिन नावडकर, कार्याध्यक्ष गणेश तांबीटकर, कोषाध्यक्ष संतोष कदम, महेंद्र खांबल यांचे उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुका नेते अविनाश मोरे, श्रीराम महाडिक, महेंद्र कलमकर, संदेश महाडिक, दत्ताराम गोरीवले, महेश गिम्हवणेकर, महिला अध्यक्षा नम्रता चिंचघरकर, आश्विनी मोरे यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले़
---------------------
दापाेलीतील प्राथमिक शिक्षक संघातर्फे वर्षभर काम करणाऱ्या हाेमगार्डचा सन्मान करण्यात आला़