चंद्रकांत करंबेळे यांच्याकडून शाळेला प्रिंटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:14+5:302021-09-24T04:37:14+5:30
वाटूळ : लांजा तालुक्यातील गव्हाणे गावचे सुपुत्र व सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका ...
वाटूळ : लांजा तालुक्यातील गव्हाणे गावचे सुपुत्र व सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका लांजाचे सहसचिव चंद्रकांत शिवराम करंबेळे यांनी उच्च न्यायालयातील प्रतिथयश वकील जितेंद्र मिश्रा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगुळे क्रमांक २ ला प्रिंटर भेट म्हणून दिला.
ही भेट चंद्रकांत करंबेळे स्वतः उपस्थित होते. त्यांनी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाकाळात विविध रुग्णालये, ग्रामपंचायती व शाळांना मोफत सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, मास्क वितरित केले आहेत. तसेच निराधार मुलांनाही त्यांनी दत्तक घेतले आहे. वनगुळे शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा हर्डीकर, उपसरपंच तन्वी तरळ व व्यवसाय व्यवस्थापन समिती सदस्यांनी या भेटीबद्दल चंद्रकांत करंबेळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमासाठी लांजा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष रामाणे, वनगुळेचे माजी सरपंच शांताराम गाडे, प्राथमिक शिक्षक नथू सोनवणे, पांचाळ समाजाचे युवा नेतृत्व अमोल मिस्त्री, शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिका अनघा हर्डीकर यांनी केले. शिक्षिका स्वप्नगंधा डंबे यांनी आभार मानले.