ST Strike : प्रवाशांचे हाल, लांजा आगाराने सुरू केली खासगी बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 02:55 PM2021-11-14T14:55:16+5:302021-11-14T14:57:11+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे.
लांजा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने गुरुवारपासून लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे.
लांजा येथे शासकीय व खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या संपामुळे हाल होत आहेत. तसेच रत्नागिरी येथे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही परवड होत आहे़ एसटीचे प्रवासी कायमस्वरूपी टिकून रहावेत, तसेच प्रवाशांची परवड थांबावी यासाठी लांजा आगाराने रत्नागिरी - लांजा ते रत्नागिरी अशी खासगी सेवा सुरू केली आहे.
लांजा बसस्थानकात ही बस उभी करून प्रवासी वाहतूक करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संपामुळे गाड्या बंद असल्याने शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले़ ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी कोणतेच वाहन नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येता आलेले नाही. संप कधी मिटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.