खासगी डाॅक्टरांनीही सहकार्य करावे : जयसिंग माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:27 AM2021-04-26T04:27:55+5:302021-04-26T04:27:55+5:30
देवरुख : देवरूख तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देवरूख येथील पंचायत ...
देवरुख : देवरूख तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देवरूख येथील पंचायत समिती कार्यालयात सभापती जयसिंग माने यांनी परिसरातील खासगी डॉक्टरांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासगी डाॅक्टरांना आराेग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सर्वांनी एकजुटीने ह्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माने यांनी यावेळी केले. या बैठकीला देवरूख परिसरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. या बैठकीत डाॅक्टरांनी केलेल्या सूचना, त्यांनी दिलेले सल्ले यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती माने यांच्यासह तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनवणे उपस्थित होते. सभापती माने यांनी सर्व डॉक्टरांना स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले.