योजनांची प्रगती असमाधानकारक

By admin | Published: December 1, 2014 09:37 PM2014-12-01T21:37:08+5:302014-12-02T00:30:56+5:30

अपेक्षा वाढल्या : पतपुरवठा घेणाऱ्यांची संख्या कमी

Progress of the projects is unsatisfactory | योजनांची प्रगती असमाधानकारक

योजनांची प्रगती असमाधानकारक

Next

श्रीकांत चाळके - खेड -राज्यातील अन्नधान्याची हेक्टरी उत्पादनक्षमता खालावली आहे. त्यासाठी उपाययोजना करूनही उत्पादनक्षमतेत वाढ होत नाही. शेतकऱ्यांचे कृषीविषयक ज्ञान वाढले पाहिजे. मात्र अनेक योजना असूनही त्यांची प्रगती, वाटचाल आणि अंमलबजावणी असमाधारकारकच राहिली आहे.
कृषीविषयक सर्व योजनांची अंमलबजावणी थेट शेतकरी गटांमार्फतच करण्याचे आघाडी शासनाने ठरविले होते़ मात्र, गेल्या दोन वर्षात तसे प्रयत्न झाले नाहीत. येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुवठा करताना हेच अधिकारी विविध प्रकारची अवघड कागदपत्र आणण्याचे संकट लादत असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपासून परावृत्त करण्याचे काम केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा आदेश असूनही अनेक बँका आजही शेतकऱ्यांना पतपुरवठा करीत नाहीत़
रत्नागिरी जिल्हा फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर राज्य सरकारचे याकडे विविध प्रकारे दुर्लक्ष झाल्याने आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत़ सरकारने याकडे डोळेझाक करू नये, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील नाचणी पिकाच्या शेतीलाही आता मोठ्या प्रमाणात उतरती कळा लागली आहे़ खेडमध्ये काहीशी हीच अवस्था आहे. मात्र, गेल्या वर्र्षभरात तिळाची शेती काहीअंशी बहरली आहे.
नाचणीची जागा तिळाच्या शेतीने घेतल्याने यावर्षी हे उत्पादन अधिक प्रमाणात होणार आहे़ या शेतीकरिता आवश्यक असे पोषक वातावरण आणि तंत्रज्ञान याविषयी खेड तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ असल्याने या पिकाविषयी साशंकता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नजीक असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत येथील तज्ज्ञांची विविध मते असल्याचे जाणवते़ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १० तालुक्यात तिळाची शेती केली जात आहे. कोकणात भात, नाचणीबरोबरच आता तिळाची शेती दिसू लागली आहे. तिळाला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते़ मात्र, याकरिता राज्य सरकारने या पिकाला संरक्षण देत कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले पाहिजेत. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ८३ एकरवर तिळाची लागवड केली आहे. कृषीविषयक आणि त्यावर आधारित शेतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठ नजीक असतानाही खेड तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नसल्याची ओरड कायम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था दापोलीत आहे़ त्याचा पुरेसा लाभ खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतीबाबतीत तालुका मागास राहीला आहे. याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे.

बाजारपेठ आवश्यक
शेतीमालाला बाजारपेठ आवश्यक.
विद्यापीठाचे तंत्र बांधावर कधी जाणार.
तीळाच्या शेतीला वाव.
कोकणात फलोद्यानाला अधिक वाव.
शासनाचे कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवण्याची गरज.

Web Title: Progress of the projects is unsatisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.