मागासवर्गीयांना पदाेन्नती आरक्षण तत्काळ द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:34+5:302021-06-19T04:21:34+5:30
खेड : मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण तत्काळ देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना आरपीआयचे तालुकाध्यक्ष विकास धुत्रे ...
खेड : मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण तत्काळ देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना आरपीआयचे तालुकाध्यक्ष विकास धुत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले. यासाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शन केली जाणार होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ निवेदन देण्यात आले. ही मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
हे निवेदन देताना तालुकाध्यक्ष विकास धुत्रे, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेश्मा तांबे, शहराध्यक्ष दीपेंद्र जाधव, गणेश शिर्के, मिलिंद तांबे, शंकर तांबे, आर. पी. येलवे, गोपी जाधव, बाळकृष्ण देवळेकर, प्रकाश जाधव, विजय गमरे, गौतम येलवे, प्रफुल्ल तांबे, जितेंद्र तांबे, श्रीकांत सकपाळ, सचिन तांबे, गौतम तांबे, लखू तांबे, पराग गमरे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते.
-------------------------
मागासवर्गीयांना पदाेन्नती आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विकास धुत्रे यांनी खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन दिले.