हर्डी रस्त्याचा नूतनीकरणाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:54+5:302021-07-19T04:20:54+5:30
राजापूर : राज्यमार्ग असलेल्या राजापूर हर्डी-रानतळे-धारतळे मार्गावरील रस्ता सलग दोन वर्षे अतिवृष्टीत वारंवार खचून वाहतूक ठप्प होत असतानाच सार्वजनिक ...
राजापूर : राज्यमार्ग असलेल्या राजापूर हर्डी-रानतळे-धारतळे मार्गावरील रस्ता सलग दोन वर्षे अतिवृष्टीत वारंवार खचून वाहतूक ठप्प होत असतानाच सार्वजनिक बांधकाम उपविभागाला आता जाग आली आहे. या उपविभागाने या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पावणेदोन कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोरोना रुग्णांना मदत
खेड : चिपळूणच्या शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय रेवणे यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष रवींद्र गवळी, सचिव राहुल भगत यांच्या प्रयत्नातून कोविड विलगीकरण कक्ष खेर्डी, चिपळूण येथील रुग्णांना सॅनिटायझर, मास्क आणि अल्पोपाहार देण्यात आला.
अपघाताची शक्यता अधिक
आरवली : मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत: खड्ड्यात गेल्याचे पहायला मिळत असून, गोळवली ते शास्त्रीपूल येथील खड्डे फक्त खडी टाकून भरल्याने अपघाताची शक्यता जास्त आहे. एकवेळ खड्डे परवडले पण खड्ड्यात टाकलेली खडी काढून टाकण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
जांभ्या दगडाने खड्डे भरले
रत्नागिरी : शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे निकृष्ठ दर्जाचे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. पूर्वी पडलेले खड्डे आणि नव्याने पडणारे खड्डे यामुळे शहरातील अनेक भागातून चालणेही कठीण झाले आहे. आता याच रस्त्यांवरील खड्डे जांभा दगडाने भरण्यात आले आहेत.
ग्रामस्थांचा पाचलशी संपर्क तुटला
राजापूर : मुसळधार पावसाचा फटका बसून पाचल बाजारपेठेतून कोंडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिवाळवाडी स्मशानजवळील मोरी कोसळून पडली आहे. त्यामुळे सुमारे ५०० ग्रामस्थांचा संपर्क तुटला असून, प्रशासनाने त्वरित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.